पीटरसनच्या तूफानी खेळीमुळे इंग्लंड लेजंड्सचा ६ धावांनी विजय
रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजमध्ये झालेल्या ९ व्या मॅचमध्ये इंग्लैड लेजंड्सनी इंडिया लेजंड्सचा ६ धावानी पराभव केला. या सामन्यात भारताने नानेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लैंड लेजंड्सकडून कर्णधार केविन पीटरसननी ३७ चेंडूमध्ये तूफानी ७५ धावा केल्या.त्यात त्याने ५ षटकार आणि ६ चौकार ठोकले. पीटरसनच्या या तूफानी खेळीच्या बळावर इंग्लैड लेजेंड्स नी १८८ धावा केल्या. इंडिया लेजेंड्सकडून यूसुफ पठाणनी सर्वाधिक 3 बळी घेतल्या. तसेच मुनाफ पटेल आणि इरफान पठाणनी प्रत्येकी २ बळी घेतले.१८९ धावांचा पाठलाग करतांना भारताचे वरच्या फळीतील फलंदाज लवकर बाद झाले होते. सचिन,सेहवाग,युवराज पवेलियनमध्ये परतल्यानंतर पठाण बंधुनी विकेट्स वाचवून खेळण्याच प्रयत्न केला. भारताच्या अष्टपैलु खेळाडू इरफान पठाणने सर्वाधिक ३४ चेंडूत ६१ धावा साकारल्या. त्यात त्याने ५ षटकर व ४ चौकार ठोकले. मनप्रीत गोनीनी ताबड़तोड़ १६ चेंडूमध्ये ३५ धावा चोपल्या. ४ षटकार व १ चौकार मारले. इंग्लैंड कडून मोंटी पानेसर नी सर्वाधिक 3 बळी घेतले जेम्स ट्रेडवेल नी आणि मैथ्यू होगगार्ड व रियान सायबॉटमने नी १-१ बळी घेतले. या सामन्यानंतरसुद्धा पॉइंट्स-टेबलमध्ये इंडिया लेजेंड्स अव्वल स्थानी आहे
काय आहे रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज ?
रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज किंवा आरएसडब्ल्यूएस ही रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्रातील रोड सेफ्टी सेलने आयोजित केलेली टी -२० क्रिकेट स्पर्धा आहे. या मालिकेत भारत, इंग्लंड, श्रीलंका, वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशातील नामांकित निवृत्त खेळाडूंचा समावेश होता. भारताचा माजी कर्णधार सुनील गावस्कर हे मालिकेचे आयुक्त आहेत, तर सचिन तेंडुलकर ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. रवी गायकवाड हे रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजचे संस्थापक आहेत. रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने(बीसीसीआय) मंजूर केली आहे.