महागाई भत्त्याच्या तीन प्रलंबित हप्त्यांचा भरणा जुलै २०२१ महिन्यात करणार असल्याची सरकारची घोषणा
७ वा वेतन आयोग: मागील एक वर्षापासुन सरकारी कर्मचा-यांना ज्याची प्रतिक्षा होती त्याला आता सरकारने मान्यता दिली आहे. मंगळवारी ९ मार्च रोजी नवीन महागाई भत्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचार्यांना दिलासा देताना थकबाकीदार हप्त्यांचा लवकरच मोबदला दिला जाईल, असे आश्वासन वित्त मंत्रालयाने दिले. अर्थमंत्री म्हणाले की, मागील तीन महागाई भत्ता (डीए) हप्त्यांचे पेमेंट जुलै २०२१ पासून सुरू होईल.
राज्यसभेला लेखी उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की,डीए न भरल्यामुळे सरकारने ३७,४३०.०९ कोटी रुपयांची बचत केली. यामुळे सरकारला गेल्या वर्षी कोरोनाव्हायरस संक्रमणास सामोरे जाण्यास मदत झाली.
वित्त मंत्रालयाने नमूद केले की, सरकारी कर्मचार्यांना १.१.२०२०, १.७.२०२० आणि १.१.२०१२ चे महागाई भत्ते अद्याप दिले गेले नाहीत.
सध्या केंद्र सरकारच्या कर्मचार्यांना १७ टक्के डीए मिळतो. गेल्या वर्षी सरकारने डीएमध्ये ४ टक्क्यांनी वाढ करून २१ टक्के करण्याचा निर्णय घेतला. ते १ जानेवारी २०२१ पासून अंमलात येणार होते. परंतु कोरोनाव्हायरस संसर्गामुळे त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही.
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये सरकारने निर्णय घेतला होता की ५० केंद्रीय कर्मचारी आणि ६१ लाख निवृत्तीवेतन धारकांचा डीए वेतनवाढ जुलै २०२१ पर्यंत कायम ठेवण्यात येईल.