गुगल कडून महिला दिन भेट : जगभरातील स्त्रियांना आर्थिक रीत्या मजबूत करण्यासाठी १८३ करोड रुपये देणार; ग्रामीण भागावर जास्त भर
अल्फाबेट आणि गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी जगभरातील व भारतातील महिलांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी 25 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 183 कोटी रुपये) देण्याचे जाहीर केले आहे. हे पैसे भारत व इतर देशांतील ना-नफा आणि सामाजिक उपक्रमांसाठी देणगी म्हणून दिले जातील .
महिला दिनानिमित्त पिचाई म्हणाले की भारतामधील गावात असणाऱ्या दहा लाख महिलांना “गुगल इंटरनेट साथी प्रोग्राम” द्वारे बिजनेस ट्यूटोरियल, टूल्स आणि मेंबरशिपच्या माध्यमातून मदत केली जाईल.
महिलांचे भविष्य सबल करण्याची संधी: पीचाई
“गूगल फॉर इंडिया” या वर्चुअल कार्यक्रमात पिचाई यांनी सांगितले की, “कोरोना महामारी मुळे महिलांची नोकरी गमावण्याची संभावना दुप्पट झाली आहे. जवळपास दोन करोड मुली परत शाळेत येणार नाहीत अशी भीती आहे. आमच्याकडे या महिलांचे भविष्य सबल व समृद्ध करण्याची ही सुवर्ण संधी आहे. “
कृषी कामगारांसाठी 3.65 कोटी
गूगल ने डिजिटल आणि आर्थिक साक्षरतेचे सह एक लाख महिला शेतमजुरांना मदत करण्यासाठी पाच लाख डॉलर्स (सुमारे 3.65 कोटी रुपये) अनुदान नासकॉम फाउंडेशनला द्यायचे जाहीर केले आहे.
गुगल आणि टाटा सोबत काम करणार
ग्रामीण भागातील महिलांच्या सशक्तीकरणासाठी गूगल, टाटा ट्रस्ट सोबत संयुक्तरीत्या काम करणार असल्याची घोषणा करण्यात आली. डिजिटल साक्षरता वाढवण्यासाठी 2015 साली “इंटरनेट साथी प्रोग्राम” लॉन्च केला गेला होता.
टाटा ट्रस्ट चे अध्यक्ष रतन टाटा म्हणाले की ग्रामीण भागातील महिलांच्या हितासाठी आजचे व उद्याचे तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे हे एक मोठे पाऊल ठरेल. कालांतराने आम्ही सुनिश्चित करू इंटरनेट चे खरे मूल्य लोकांसमोर यावे.
3 कोटी ग्रामीण महिलांना फायदा
गेल्या सहा वर्षात इंटरनेट साथी प्रोग्राम 80000 ऊन जास्त इंटरनेट साथींच्या मदतीने संपूर्ण भारतात तीन कोटीहून अधिक महिलांना प्रशिक्षण दिले आहे.
“विमेन विल” प्लॅटफॉर्म लॉन्च केला
गूगलने “विमान विल प्लॅटफॉर्म” सुरू केला आहे असेही जाहीर केले. हा वेब प्लॅटफॉर्म ग्रामीण महिला उद्योजकांसाठी कम्युनिटी सपोर्ट, मार्गदर्शन आणि प्रवेगक कार्यक्रमांना मदतीचा ठरेल. हा वेब प्लॅटफॉर्म हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. ज्या महिला उद्योजक होऊ इच्छितात त्यांच्यासाठी हा खास रित्या तयार करण्यात आला आहे.