पॉलिटीक्स

ममता बॅनर्जी लढणार नंदीग्राममधून:टीएमसीच्या २९१ उमेदवारांची घोषणा

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१

टीम यंगिस्तान : पश्चिम बंगालच्या निवडणूकीच्या अगोदरच तृणमुल काँग्रेस कडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.यात पक्षातील सत्तेच असणा-या बहुतेक आमदारांना टिकीट देण्यात आली आहे. या विधानसभा निवडणूकीत तृणमुल काँग्रेस कडून २९१ उमेदवारांची घोषणा पक्षाच्या बैठकीनंतर करण्यात आली असून ममता बॅनर्जी स्वत: नंदीग्राम लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.ममता बॅनर्जी यांचा गड मानल्या जाणा-या भवानीपुर मध्ये शोभन देब यांना उमेदवारी दिल्याचे पाहायला मिळाले.

या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून तृणमुल काँग्रेसचे माजी नेते आणि ममता बॅनर्जी यांच्या अगदीच जवळचे असलेले सुवेंदु अधिकारी यांना उमेदवारी मिळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.पश्चिम बंगालमधील २९१ जागावर टीएमसीच्या उमेदवारांना उमेदवारी दिली असून उत्तर बंगालमधील ३ जागा अजुन शिल्लक असल्याचे त्यांनी सांगीतले.

ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांंगीतले की त्यांंच्या पक्षाने २९१ लोकांची यादी जाहिर करताना महिलां ५०, मुस्लीम ४२ उमेदवारांची निवड करुन त्यांना उमेदवारी दिल्याचे स्पष्ट केले.याखेरीज उत्तर बंगालच्या ३ जागा मित्रपक्षांसाठी शिल्लक ठेवल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *