६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर कंगना रानौत, मनोज बाजपेयी, आणि धनुष यांची मोहोर
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षात पुरस्कारांची घोषणा नव्ह्ती झाली
६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा सोमवारी करण्यात आली. यात अभिनेत्री कंगना रानौतला ‘मणिकर्णिका’ आणि पंगा’ या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. कंगनाला यापुर्वी
१) फॅशन- बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेस(२००८)
२) क्वीन- बेस्ट अॅक्ट्रेस(२०१४)
३) तनु वेड्स मनु रिटर्न्स-बेस्ट अक्ट्ररेससाठी राष्ट्रीय पुरस्कार भेटले आहे.
तर हा पुरस्कार तिच्या करिअर मधला चौथा राष्ट्रीय पुरस्कार आहे.
मनोज बाजपेयी व धनुष दोघांना सर्वत्कृष्ट अभिनेते या पूरस्काराने सम्मानित करण्यात आले. हा पुरस्कार दोघांना विभागून देण्यात आला.
तसेच सर्वत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा मान सुशांत सिंग राजपूत अभिनीत ” छिछोरे” या चित्रपटाला मिळाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले आहे.
मराठी सर्वत्कृष्ट चित्रपट पुरस्काराचा मान ‘बार्डो’ या चित्रपटाने मिळवला. या चित्रपटाचे दिग्दर्शक भिमराव मूडे हे आहेत
मकरंद देशपांडे, अशोक समर्थ, आणि अंजली पाटील हे मुख्य पात्रात आहे.
मागील वर्षी कोरोनामुळे राष्ट्रीय पुरस्कार दिले गेले नव्हते म्हणून यावर्षी २०१९ मध्ये रिलीज चित्रपटांना पुरस्कार देंण्यात आले आहे.
हे पुरस्कार केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रलयाच्या अंतर्गत येणाऱ्या चित्रपट महोत्सव संचालनालयाकडून देण्यात येत असतात.
हे पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात येते.
फीचर फिल्म विभागात पुरस्काराची घोषणा
•स्पेशल मेंशन- बिरियानी (मल्याळम), जोनाकि पोरवा (असमिया)
लता भगवानकरे (मराठी)
पिकासो (मराठी)
बेस्ट हरियाणवी चित्रपट- छोरियां छोरों से कम नहीं
बेस्ट छत्तीगढ़ी चित्रपट- भुलन दी मेज
बेस्ट तेलुगु चित्रपट- जर्सी
बेस्ट तमिळ चित्रपट- असुरन
बेस्ट पंजाबी चित्रपट- रब दा रेडियो 2
बेस्ट मलियाली चित्रपट- कला नोत्तम
बेस्ट मराठी चित्रपट- बार्डो
बेस्ट हिंदी चित्रपट- छिछोरे
•बेस्ट सहाय्यक एक्ट्रेस- पल्लवी जोशी (द ताश्कंद फाईल्स)
•बेस्ट सहाय्यक एक्टर- विजय सेतुपती (सुपर डिलक्स)
बेस्ट फीमेल प्लेबॅक- सावनी रवींद्र (बार्डो)
बेस्ट मेल प्लेबॅक- बी. प्राक (तेरी मिट्टी)
बेस्ट एक्ट्रेस- कंगना रनौत (पंगा आणि मणिकर्णिका)
बेस्ट एक्टर- मनोज बाजपेयी (भोसले) अभिनेता धनुष (असुरन)
बेस्ट डायरेक्टर- संजय पूरे सिंह चौहान (भट्टर हूरेन)
बेस्ट इन्वेस्टीगेटीव्ह – जक्कल
सामाजिक हक्कांवर आधारित चित्रपट- होली राईट्स (हिंदी), लाडली (हिंदी)
बेस्ट पर्यावरण विषयक चित्रपट- द स्टॉर्क सेवियर्स
बेस्ट चित्रपट (समीक्षक पसंती) – सोहिनी चट्टोपाध्याय
बेस्ट पॉप्युलर फिल्म- महर्षी
इंदिरा गांधी अवॉर्ड फॉर बेस्ट डेब्यू फिल्म ऑफ ए डायरेक्टर- हेलन (मल्याळम)
-बेस्ट फीचर फिल्म- मल्याळम फिल्म (Marakkar Arabikkadalinte- SimHam)