उन्हाळ्यात अगदी सोप्या पद्धतीने घ्या त्वचेची काळजी
उन्हाळा सुरू होतोय तर त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे. त्वचेची काळजी न घेतल्यास अनेक दुष्परिणाम आपल्याला पहायला मिळतात.त्वचेवर पांढरे डाग पडणे, कोरडी पडणे,सुरकुत्या पडणे,पुरळ उठणे असे अनेक परिणाम दिसतात.एकुणच घरबसल्या आपण त्वचेची काळजी घरगुती पद्धतीने घेऊ शकतो. यात अनेक घरातीलच उपलब्ध असलेले साहित्य आपण वापरु शकतो.
१) तांदळाच्या पिठाचा स्क्रब : दोन चमचे तांदळाचे पीठ व दोन चमचे दही. दह्या मुळे चेहरा चकचकीत होतो तर तांदळाच्या पिठा मुळे स्कीन व्हाईटनि होते व्हीट्यामीन बी सत्वामुळे स्किन मधील पेशा वर येता त्यामुळे चेहरा टवटवीत व गोरा दिसतो.
२) बेसनाचा फेसपॅक : बेसन, गुलाब जल, लिंबाचा रस,हळद व मध यांचे मिश्रण करून चेहेऱ्यावर लावावे आणि १५ मिनिटांनी थंड पाण्याने धुऊन घ्यावा व सुती कापडाने पुसून घ्यावा या फेसपॅक मुळे चेहरा तजेलदार व नितळ दिसु लागतो हा प्रयोग आठवड्यातून दोन वेळा करवा.
३)कच्च्या बटाटा: कच्च्या बटाटा जर चेहऱ्यावर लावले तर आपल्या चेहेऱ्याचे सौंदर्य वाढते. सुरकुतलेला व चेहरा ओठाला गेल्या सारखा असेल तर कच्च्या बटट्याचा रस लावू शकता.या दोन्ही फेसपॅकचा वापर आठवड्यातून दोन ते तीन वेळा करवा. हा प्रयोग केल्याने चेहेऱ्यामधे नक्कीच बदल दिसून येईल
४) गुलाब जल : गुलाब जल हे चेहऱ्यासाठी खुप उपयोगी पडते. गुलाब जल मुळे चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारची चमक येते गुलाब जल कापसाच्या गोळ्या वर धुऊन आल्हाद दायक लावावे व ते वाळु द्यावे. त्यामुळे चेहऱ्यावर ताजे पणा चार भाव दिसून येतो.सर्वात महत्त्वाचे म्हणजे उन्हाळ्यात जास्तीत जास्त पाणी आणि फळांचा रस प्यावे त्यामुळे देखील ही त्वचा टवटवीत दिसते.
टिप: हा प्रयोग करण्यात पुर्वी चेहेरा स्वच्छ करावा.