इंटरटेनमेंट

आरआरआर मूव्ही चे पोस्टर रिलीज….

आर आर आर (RRR)  चित्रपटाचे चाहते एस एस राजामौलीच्या दिग्दर्शित या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. राम चरण, जूनियर एनटीआर, आलिया भट्ट या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. नव विक्रम संवतच्या निमित्ताने या चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले असून, यात राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर एकत्र दिसले आहेत. जमावाने या दोघांनाही उचलून घेतले आहे, असे या पोस्टरमध्ये दाखवण्यात आले आहे . राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर या दोघांनीही आपल्या सोशल मीडियावर हे पोस्टर शेअर केले आहे. राम चरण यांनी हे पोस्टर शेअर करताना लिहिले की ‘मला आशा आहे की आपणा सर्वांचे नवीन वर्ष आनंदमय होईल.’ हे पोस्टर सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. पोस्टरमध्ये दोघांनी पांढर्‍या रंगाचा कुर्ता पायजमा घातला आहे आणि डोक्यावर पिवळा पट्टा बांधला आहे.आलिया भट्टचा सीता लुकही चर्चेत आहे. नुकतीच अभिनेत्री आलिया भट्टच्या वाढदिवशी RRR चित्रपटातील सीताच्या भूमिकेतील तिचा लूक रिलीज करण्यात आला होता. पोस्टरमध्ये आलिया हिरव्या रंगाची साडी परिधान केलेली दिसली होती. सोशल मीडियावर आलियाच्या या लूकचे जोरदार कौतुक झाले. हा चित्रपट आता तेलगू, हिंदी, तामिळ, मल्याळम, कन्नड आणि इतर बर्‍याच भारतीय भाषांमध्ये प्रदर्शनासाठी पूर्णपणे तयार आहे. आता अशा परिस्थितीत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करेल हे येणारा काळच सांगेल. पॅन-इंडिया फिल्म्स या बहुप्रतिक्षित चित्रपटाने दसराच्या निमित्ताने 13 ऑक्टोबर 2021 रोजी जगभरात रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *